महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जमाव जमवून 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीस मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पालघर येथील एका बंगल्यात हरण डांबून ठेवले असल्याची गुप्त माहिती वनविभागाला ईटीव्ही भारतचे पालघर येथील प्रतिनिधी विपुल पाटील यांनीच दिल्याचा आरोप करत ओघे कुटुंबीयांनी जमाव जमवून विपुल पाटील व त्यांच्या आईस मारहाण केली.

etv bharat journalist-beaten in-virar
etv bharat journalist-beaten in-virar

By

Published : Apr 29, 2020, 10:41 AM IST

पालघर- हरीण पाळल्या प्रकरणी वन विभागाने केलेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून चौघांनी जमाव जमवून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीस शिवीगाळ करत मारहाण केली. रविवारी दुपारी विरार पूर्वेच्या कोपरी गावात घडलेल्या या घटनेप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे कोपरी गावात काही वेळ तणावाचे वातावरण पसरले होते.

जमाव जमवून 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीस मारहाण

हेही वाचा-न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

दोन महिन्यांपूर्वी विरारच्या कोपरी गावातील एका बंगल्यात डांबून ठेवलेल्या हरणाची सुटका करण्यात मांडवी वन विभागाला यश आले होते. माध्यमांनीही हा प्रकार निर्भीडपणे जनतेसमोर मांडला होता. याप्रकरणी प्रथमेश ओघे व त्याच्या साथीदाराला वनविभागाकडून अटक झाली होती.

पालघर येथील एका बंगल्यात हरण डांबून ठेवले असल्याची गुप्त माहिती वनविभागाला ईटीव्ही भारतचे पालघर येथील प्रतिनीधी विपुल पाटील यांनीच दिल्याचा आरोप करत ओघे कुटुंबीयांनी जमाव जमवून विपुल पाटील व त्यांच्या आईस मारहाण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी, संचासबंदी असताना जमाव जमवून मारहाण करण्यात आली. या प्रकाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, हे प्रकरण जरी दोन महिन्यापूर्वीचे असले तरी ते बातमी केल्या संदर्भातील असून त्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर व पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांनी केली आहे.

पत्रकारांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या लोकांवर वेळीच उपचार केले पाहीजे. पोलीस याप्रकरणी आरोपींवर कारवाई करतील तसेच विपूल पाटील व कुटुंबियांच्या जीवितास धोका होवू नये याची काळजी घेतीलच असे मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, प्रभाकर ओघे, निखिल ओघे, बंटी ओघे व राजेश ओघे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी

ABOUT THE AUTHOR

...view details