महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी; गुन्हा दाखल - Balasaheb Malonde threat case Palghar

एन्काउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच बघून घेण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली असून शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रदीप शर्मा

By

Published : Oct 22, 2019, 4:14 PM IST

पालघर- एन्काउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच बघून घेण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली असून शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विरार पूर्व चंदनासार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना निवडणूक मैदानात उतरवले होते. प्रदीप शर्मांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात चांगलाच जोर लावला आहे. प्रचारादरम्यान शर्मा आणि ठाकूर गटात अनेकदा वाद झाले. मात्र, आता मतदान अधिकाऱ्यांशीही वाद केल्याने प्रदीप शर्मांवर अरेरावीचा आरोप होत आहे. मतदान केंद्रात जबरदस्ती प्रवेश करणे, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे, असे गंभीर आरोप प्रदीप शर्मांवर आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर आयपीसी १८६, ५०४, ५०६, लोक प्रतिनिधी कायदा कलम १३१ (१)(२), १७१ (ब) प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-पालघर जिल्ह्यात 59.5 टक्के मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details