महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजचे खांब पडल्याने जव्हार, मोखाडा तालुक्यात अंधार; जनजीवन विस्कळीत - जनजीवन विस्कळीत

जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडल्याने दोन्ही तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पोल पडल्याने शुक्रवारी रात्री १०.३० पासून वीज पुरवठा खंडित झाला असून दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरीकांची प्रतिक्रिया

By

Published : Jun 29, 2019, 9:49 PM IST

पालघर- जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडल्याने दोन्ही तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पोल पडल्याने शुक्रवारी रात्री १०.३० पासून वीज पुरवठा खंडित झाला असून दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरीकांची प्रतिक्रिया


शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडला व त्याबरोबर दोन पोलही पडल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालाअसून ते अंधारमय झाले आहे. या घटनेमुळे जव्हार तालुक्यातील २६ हजार ग्राहक व मोखाडा तालुक्यातील सुमारे १२ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला असून अजूनपर्यंत तो सुरळीत न झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्रीपासून कार्यरत असून पाऊस खूप असल्याने कामात अडथळा येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details