पालघर- राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवार आपल्या प्रचारासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करतील याचा काही नेम नाही. पालघरमध्ये सध्या भात कापणीच्या कामांना सुरुवात झाली असून मतदार शेतीच्या कामात व्यग्र आहेत. शेतीच्या कामात गुंतलेल्या मतदारांना भेटण्यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी एक वेगळीच क्लृप्ती लढवली.
मतांसाठी कायपण, 'या' उमेदवाराचा भात कापणी करत प्रचार - पालघर विधानसभा निवडणूक
शेतीच्या कामात गुंतलेल्या मतदारांना भेटण्यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी एक वेगळीच क्लृप्ती लढवली.
rice-harvest
एक कुटुंब आपल्या शेतात भात कापणीच्या कामात व्यग्र असलेले त्यांना दिसले. त्यानंतर श्रीनिवास यांनी थेट शेतात धाव घेतली आणि भात कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्यासोबतच भात कापण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना त्यांच्या कामात मदत करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचा प्रचार करण्याचा हा अनोखा अंदाज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
Last Updated : Oct 16, 2019, 12:39 AM IST