महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar Gram Panchayat Election: पालघर जिल्ह्यात 13 ऑक्टोबरला 342 ग्रामपंचायत निवडणुका, निवडणुक कार्यक्रम जाहीर - पालघर जिल्ह्यात 342 ग्रामपंचायत निवडणुका

पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला Gram Panchayat Elections in Palghar District आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये निवडणूक होत असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच व सदस्य वर्गासाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा हा कार्यक्रम Election Program Announced जाहीर केला. Election Program Announced 342 Gram Panchayat Elections in Palghar District

Gram Panchayat Elections in Palghar
पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका

By

Published : Sep 8, 2022, 11:11 AM IST

पालघर- पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाGram Panchayat Elections in Palghar District आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये निवडणूक होत असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच व सदस्य वर्गासाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा Gram Panchayat Elections हा कार्यक्रम जाहीर केला.

वसई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतमध्ये ओबीसी आरक्षणजानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या, तसेच मागील निवडणुकीत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक घेतली जाणार आहे. याआधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पालघर जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण अलीकडेच जाहीर झाले. यामध्ये पालघर तालुक्यातील 38 तर वसई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे. तर इतर सहा तालुक्यांमध्ये आरक्षण अनुसूचित जातींसाठी कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर हा कार्यक्रम जाहीर केला 342 Gram Panchayat Elections in Palghar District गेला.

14 ऑक्टोबर रोजी मतमोजणीऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने काढलेल्या निवडणूक कार्यक्रम पत्रात म्हटले आहे. 13 सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस तहसीलदारांमार्फत तालुकास्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल. 21 ते 27 सप्टेंबर पर्यंत उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र दाखल करू शकणार आहेत. यामध्ये शनिवार व रविवार सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची 28 सप्टेंबर रोजी छाननी केली जाईल. त्यानंतर 30 सप्टेंबर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह तसेच पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.


तालुका ग्रामपंचायती -डहाणू - 62, विक्रमगड - 36, जव्हार - 47, वसई - 11, मोखाडा - 22, पालघर - 83, तलासरी - 11, वाडा - 70.

अनुसूचित जातीसाठी आरक्षण कायमपालघर जिल्ह्यातील अंशतः अनुसूचित क्षेत्र असलेल्या पालघरमधील ३८ तर वसईतील आठ ग्रामपंचायतींना ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर व वसई तालुक्यातील या ग्रामपंचायत वगळता इतर सहा तालुक्यांमध्ये शंभर टक्के अनुसूचित जातींसाठी आरक्षण लागू राहणार आहे. या सहा तालुक्यांच्या ग्रामपंचायतींमध्येही ओबीसींची काही प्रमाणात लोकसंख्या असली तरी तेथे अनुसूचित जातीसाठीच आरक्षण कायम असल्याने ओबीसी समजामध्ये नाराजी पसरली आहे.


आता सरपंच हे थेट जनतेतून निवडून येणारअसल्याने सरपंच पदासाठी सर्वत्र चुरस दिसून येणार आहे. तसेच गावातील मतदार वर्ग आपल्याकडे करण्यासाठी या पदाच्या दावेदार असलेल्या उमेदवाराला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. Election Program Announced 342 Gram Panchayat Elections in Palghar District

हेही वाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल निवडून आणण्याची ५० वर्षांची परंपरा; म्हसावदच्या चिंचोरे परिवाराची किमया

ABOUT THE AUTHOR

...view details