महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Arrested for Taking Bribe : शिक्षणाधिकारी लता सानप यांना 25 हजारांची लाच घेताना अटक - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी (Education officer) लता सानप यांना 25 हजारांची लाच घेताना अटक (arrested for accepting bribe of Rs 25,000) करण्यात आली आहे. बोईसर रोडवरील एका गृहसंकुलातील सदनिकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) सानप याना रंगेहात पकडले.

Lata Sanap
लता सानप

By

Published : Apr 27, 2022, 9:13 AM IST

पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी एका शिक्षकाच्या बदली प्रस्तावासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र सदर शिक्षकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तक्रार केली केली. तत्पुर्वी त्यांच्यात तडजोडी अंती 25 हजार रुपये लाच देण्या बाबत ठरले.नंतर बोईसर- पालघर रोडवरील एका गृहसंकुलातील सदनिका परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यात शिक्षणाधिकारी लता सानप यांना तक्रारदार शिक्षकाकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले व अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details