पालघर :जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच असून आज (मंगळवार) सकाळी 9.50 वाजता भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. डहाणू, कासा, धुंदलवाडी, चिंचले, तलासरी व आसपासच्या परिसरात परिसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. सोमवारी सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. तर, शुक्रवारी 2.8, 3.6 व 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज सकाळी 9.50 वाजता पुन्हा 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. मात्र, या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.