महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर- डहाणू व तलासरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच असून आज पहाटे देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतीय सिस्मोलॉजी विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.6, 2.2, 2.6 व 3.5 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. डहाणू, कासा, धुंदलवाडी, चिंचले, तलासरी व आसपासच्या परिसरात परिसरात हे धक्के जाणवले आहेत.

earthquake in palghar
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के, नागिकांमध्ये भीतीचं वातावरण

By

Published : Sep 11, 2020, 8:30 AM IST

Updated : Sep 11, 2020, 9:31 AM IST

पालघर - डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाच्या धक्क्याचे सत्र सुरूच असून आज पहाटे देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतीय सिस्मोलॉजी विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.6, 2.2, 2.6 व 3.5 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. डहाणू, कासा, धुंदलवाडी, चिंचले, तलासरी व आसपासच्या परिसरात परिसरात हे धक्के जाणवले आहेत.

डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच असून आज पहाटे देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून सोमवारी सकाळी 8 वाजून 7 मिनिटांच्या सुमारास सुमारास 3.5 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा व मंगळवारी 9. 50 वाजता 3.8 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. तर मागील आठवड्यात शुक्रवारी(4 सप्टेंबर) रोजी 2.8, 3.6 व 4.0 रिश्‍टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरातील अनेक घराचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान आज पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केल, 3 वाजून 53 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केल, 3 वाजून 57 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे चार धक्के बसले आहेत. आज बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात नोव्हेंबर 2018 पासून या भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. पावसाळ्याच्या दरम्यान धक्के बसत नव्हते. मात्र गेल्या 15 दिवसांपासून हे भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एकूण सहा भूकंपाचे धक्के

3 वाजून 45 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केल, 3 वाजून 53 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केल, 3 वाजून 57 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केल, 5 वाजून 4 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केल, 5 वाजून 45 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केल आणि 7 वाजून 6 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे असे एकूण सात भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही.

Last Updated : Sep 11, 2020, 9:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details