महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरात रात्रीतून भूकंपाचे तीन धक्के; डहाणू-तलासरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, रात्री 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास सुमारास 3.5 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा, पहाटे 4 वाजून 12 मिनिटांच्या सुमारास 2.1 आणि 5 वाजून 49 मिनिटांनी 2.0 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा असे एकूण तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Earthquake in Palghar district
पालघरात रात्रीतून भूकंपाचे तीन धक्के; डहाणू-तलासरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By

Published : Sep 22, 2020, 7:56 AM IST

Updated : Sep 22, 2020, 10:58 AM IST

डहाणू (पालघर) - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार रात्रीपासून तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.5, 2.1, 2.0 रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. डहाणू, कासा, धुंदलवाडी, चिंचले, तलासरी व आसपासच्या परिसरात परिसरात हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, रात्री 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास सुमारास 3.5 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा, पहाटे 4 वाजून 12 मिनिटांच्या सुमारास 2.1 आणि 5 वाजून 49 मिनिटांनी 2.0 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा असे एकूण तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. तसेच सोमवारी 2.4, रविवारी 2.4 व 2.8 रिश्‍टर तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही.

पालघरात रात्रीतून भूकंपाचे तीन धक्के

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. पावसाळ्याच्या दरम्यान धक्के बसत नव्हते, मात्र गेल्या महिनाभरापासून या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे या परिसरातील अनेक घरांना तडे गेले असून घरांचे नुकसान देखील झाले आहे.

Last Updated : Sep 22, 2020, 10:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details