पालघर - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात शनिवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. कासा, चारोटी, पेठ, शिसने, आंबोली या गावांना भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र, प्रशासनामार्फत याची अधिकृत पुष्ठी करण्यात आलेली नाही.
पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के - पालघर भूकंप न्यूज
मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दोन दिवसात भूकंपाचे सहा सौम्य धक्के डहाणू आणि तलासरी परिसराला बसले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
हेही वाचा - अलिबागमध्ये मराठा आरमार दिवस साजरा, कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीस्थळी पूजन
शुक्रवारीदेखील डहाणू आणि तलासरी परिसरात 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल तीव्रतेचे 5 धक्के बसले होते. त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मागील दीड वर्षापासून पालघर जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.