पालघर- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मागील २ वर्षांपासून अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. अशात कोरोना आणि पावसाळा यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पालघरवासीयांनी मदतीसाठी शासनाकडे याचना करत आहेत.
डहाणू तलासरी तालुक्यात २३ ऑगस्ट रोजी दिवसभर अनेक गावांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे ९ भूकंपाचे धक्के बसले. यामध्ये सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांनी बसलेला धक्का २.८ रिस्टर स्केल क्षमतेचा झाल्याची नोंद झाली. तर, सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी बसलेला धक्का २.३ रिस्टर स्केल क्षमतेचा होता. अशा घटना वारंवार होत आहेत. त्यातच कोरोना आणि पावसाळा असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांची आहे.