Palghar Breaking: डहाणू-तलासरी परिसरात भूकंप; रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद - 3.7 रीश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
पालघर जिल्ह्यातील डहाणू-तलासरी परिसरात 3.7 रीश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
डहाणू-तलासरी परिसरात भूकंपाचा धक्का
पालघर (डहाणू) - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज 11 वाजून 57 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. बोर्डी, घोलवड, तलासरी, चारोटी भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी माहिती दिली आहे.