पालघर (डहाणू) - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज (गुरुवार) 11 वाजून 57 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. बोर्डी, घोलवड, तलासरी, चारोटी भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी माहिती दिली आहे. धक्क्याने अनेकांच्या घरांच्या भिंतींना तडे गेलेले आहेत.
डहाणू-तलासरी परिसरात भूकंप; रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद - भूकंपाचे धक्के
पालघर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने डहाणू आणि तलासरी हादरले आहे. मागील दीड ते दोन वर्षांपासून पालघर मधील डहाणू आणि तलासरी भागात सतत भूकंपाचे सत्र सुरूच आहे. काही काळ हे धक्के जाणवत नसल्याचे समोर आले होतं. मात्र आज दुपारी 11:57 च्या सुमारास पुन्हा एकदा पालघरच्या डहाणू आणि तलासरी या तालुक्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
मागील दीड ते दोन वर्षापासून बसत आहे भूकंपाचे धक्के-
पालघर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने डहाणू आणि तलासरी हादरले आहे. मागील दीड ते दोन वर्षांपासून पालघर मधील डहाणू आणि तलासरी भागात सतत भूकंपाचे सत्र सुरूच आहे. काही काळ हे धक्के जाणवत नसल्याचे समोर आले होतं. मात्र आज दुपारी 11:57 च्या सुमारास पुन्हा एकदा पालघरच्या डहाणू आणि तलासरी या तालुक्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेकांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे येथील शेकडो घरे सध्या धोकादायक बनत चालली आहेत .