महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचा धक्का, 3.4 रिश्टर स्केलची नोंद - पालघरला भूकंपाचा धक्का

पालघरच्या डहाणू, कासा, धुंदलवाडी, चिंचले, तलासरी व आसपासच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहेत. भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

earthquake
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Nov 9, 2020, 11:23 AM IST

पालघर - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज सकाळी 5 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. डहाणू, कासा, धुंदलवाडी, चिंचले, तलासरी व आसपासच्या परिसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, या परिसरात सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा -वालीव पोलिसांकडून घरफोडी प्रकरणात पाच आरोपींना अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

2018 पासून सुरू आहे भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र -
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. पावसाळ्याच्या दरम्यान धक्के बसत नव्हते, मात्र गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून या परिसरात या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात मागील अनेक महिन्यांपासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच असून, या परिसरातील अनेक घरांना तडे गेले असून घरांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -थंडीची चाहूल.. पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर तपकिरी डोक्याचा कुरव (Brown Headed Gull) पक्षांचे आगमन

ABOUT THE AUTHOR

...view details