पालघर -जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज (शुक्रवारी) साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
पालघर : डहाणू-तलासरीत भूकंपाचे धक्के - पालघरमध्ये भूकंप
पालघर जिल्ह्यात 3.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे.
प्रातिनिधीक छायाचित्र
हेही वाचा -संगमनेर तालुक्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जिल्ह्यातील कासा, धुंदलवाडी, तलासरी, उंबरगाव, बोर्डी, घोलवड या परिसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जिल्ह्यात अधूनमधून पावसाची संततधार सुरू असताना आणि त्यामध्येच अचानक बसलेल्या या भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.