महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर-देवगांव रस्त्यावर नुसता 'धुरळा' - पालघर-देवगांव रस्ता दुरुस्ती

पालघर -वाडा-देवगांव रस्ता रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात आहे. हे काम सुरुवातीला जोमाने सुरू केले. परंतु, या रस्त्याच्या कामामुळे येथून प्रवास करणाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

palghar
पालघर-देवगांव रस्त्यावर नुसता 'धुरळा'

By

Published : Feb 5, 2020, 11:46 AM IST

पालघर - जिल्ह्यातील पालघर -वाडा-देवगांव रस्ता रुंदीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्त्याच्या या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे.

पालघर-देवगांव रस्त्यावर नुसता 'धुरळा'

हेही वाचा -तारापूर औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला आग; दोन कामगार जखमी

जिल्ह्यातील पालघर -वाडा-देवगांव रस्ता रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात आहे. हे काम सुरुवातीला जोमाने सुरू केले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी खोदण्याचे सुरू केले होते. मात्र, आता ती कामे संथगतीने सुरू आहेत. परिणामी खोदाईतून निघणाऱ्या धुळामुळे एखादे वाहन तेथून गेले की, सर्वत्र धुरळा उडत असतो. या रेंगाळलेल्या कामाचा फटका येथून जाणाऱ्या प्रवाशीवर्गाला बसत आहे. धुळीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे नाकावर मास्क, रुमाल बांधून प्रवास करतायत

ABOUT THE AUTHOR

...view details