महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात बस आणि डंपरचा अपघात; दोघींचा मृत्यू, 15 प्रवासी गंभीर जखमी - दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Bus Accident News : पालघरमध्ये आज दुपारी एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत.

Dumper And  ST Bus Accident
बस आणि डंपरचा अपघात

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 4:04 PM IST

बस आणि डंपरचा अपघात

पालघरBus Accident News : पालघरच्या मनोर-विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणींचा जागीच मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू: याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या (Palghar) मनोर विक्रमगड रोडवर आज (३० डिसेंबर) बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव डंपरने बसला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल : यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावितही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जखमींना मदत करत उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जण गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात एसटी बसचा चक्काचूर झाला आहे.

डंपरनं बहीण भावाला चिरडल्याची दुर्दैवी घटना : (Nagpur Accident News) शुक्रवारी असाच एक अपघात नागपुरात घडला होता. शहरालगत असलेल्या बिडगाव भागात कचरा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरनं बहीण भावाला चिरडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. यामध्ये १६ वर्षीय अंजली सैनी ही बहीण आणि १८ वर्षीय सुमित सैनी या भावाचा जागीच मृत्यू झाला होता. मुलगी एका इंटरनेट कॅफेत काम करत होती तर भाऊ गॅरेजमध्ये काम करत होता. बहीण भावाला डंपरने चिरडल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपर जाळला आणि इतर गाड्यांच्या काचा ही फोडल्या होत्या. बिडगाव परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा -

  1. डंपरच्या धडकेनंतर पेटली बस; बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 14 जण गंभीर
  2. Road Accident In Kashmir : तीनशे फूट दरीत कोसळली बस: दोडा जिल्ह्यात भीषण अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू
  3. British Embassy Secretary Car Accident : ब्रिटिश दूतावासाच्या सचिवांच्या कारला अपघात; खासगी बस चालकावर गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details