पालघर/विरार - विरार शहरात एका अमली पदार्थ तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. विरार पोलिसांनी मंगळवारी केलेल्या या कारवाईत या तस्कराकडून २५० ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. ओमप्रकाश भगाराम पटेल, २७ ( सध्या रा. नारंगी फाटक जवळ, विरार पूर्व) असे त्या अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्कराचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानाचा रहिवासी आहे.
विरारमधून अमली पदार्थ तस्कर जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त - drug peddler arrested news
विरारमध्ये अमलीपदार्थाची तस्करी आणि विक्री करणाऱ्या एका तस्काराला विरार पोलिसांनी जरेबंद केले आहे. त्याच्याकडून २५० ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे.
विरार पूर्वेकडील आर. जे. नाका येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून ओमप्रकाश भगाराम पटेल याला अटक केली. त्यावेळी त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये २५० ग्रॅम अफीम आढळून आले. पोलिसांनी तो अमली पदार्थ हस्तगत करून एक लाल रंगाची मारुती झेन (कार क्रं. एम एच-०४/ए एक्स-३२४०) असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.