महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BREAKING: चार कोटी रुपये घेऊन ड्रायव्हर पसार, एटीएमसाठी पैसे घेऊन आलेली गाडीच पळवली

कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली गाडीच ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

driver hijacked the car that was paying at the atm im palghar
BREAKING: एटीएममध्ये पैसे भरणारी गाडीच ड्रायव्हरने पळवली

By

Published : Nov 12, 2020, 8:58 PM IST

Updated : Nov 12, 2020, 9:21 PM IST

पालघर/विरार- विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली गाडीच ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर हा प्रकार घडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते सव्वा चार कोटी रुपये हे गाडीत असून ती ड्रायव्हरने पळवल्याचे सांगितले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

Last Updated : Nov 12, 2020, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details