पालघर- अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या जनतेने कुठल्याही दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर करू नये. यासोबतच खरेदी करताना सोशल डिस्टन्स ठेवावे. विनाकारण फिरणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे, नागरिकांना याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी केले.
अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी वाहनांचा वापर, आता होणार गुन्हे दाखल
शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना नागरिक किराणा माल, भाजीपाला खरेदी आणि बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यातच सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार दिसून येत होता.यावर वाडा पोलीस ठाण्याकडून वाहन जप्ती आणि गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
वाडा शहरात पोलिसांनी लाँग मार्च काढून कोरोना प्रादुर्भावाच्या उपयायोजनेवर सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना नागरिक किराणा माल, भाजीपाला खरेदी आणि बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यातच सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार दिसून येत होता.
दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन अनेकजण फिरताना दिसत होते. यावर वाडा पोलीस ठाण्याकडून वाहन जप्ती आणि गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याबाबत 8 एप्रिलला शहरातील नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.