पालघर - दिवाळी असल्याने सर्वत्र फटाक्यांची दुकाने सजली आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. वायू प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न वाजविण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पालघरमध्ये चॉकलेट फटाके हा अनोखा प्रकार बाजारात विक्रीसाठी आला आहे. चॉकलेटच्या माध्यमातून फटाक्यांचे विविध प्रकार तयार करण्यात आले आहे. सध्या या चॉकलेट फटाक्यांना मोठी मागणी असून बच्चेकंपनीसह नागरिकांकडूनही याला पसंती दिली जात आहे.
पालघर तालुक्यातील टेंभोडे येथील स्मिता पाटील यांनी फटाक्यांचे विविध प्रकार चॉकलेटच्या माध्यमातून बनवले आहेत. गतवर्षी काही प्रमाणात चॉकलेट फटाके बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तो काहीसा यशस्वी झाल्यानंतर यंदाच्या दिवाळीत एक महिनाआधीच त्यांनी चॉकलेट फटाके बनवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिल्यानंतर या चॉकलेट फटाक्यांना उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. फटाके आणि चॉकलेट हे लहान मुलांच्या आवडीचे असल्याने चॉकलेट फटाके लहान मुलांना देखील आकर्षित करीत आहेत. गिफ्ट म्हणून देण्यासाठी चॉकलेट फटाक्यांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.
पालघरमध्ये लोकप्रिय होताहेत चॉकलेट फटाके... - firecrackers ban
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न वाजविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पालघरमध्ये चॉकलेट फटाके हा अनोखा प्रकार बाजारात विक्रीसाठी आला आहे. चॉकलेटच्या माध्यमातून फटाक्यांचे विविध प्रकार तयार करण्यात आले आहे. सध्या या चॉकलेट फटाक्यांना मोठी मागणी असून बच्चेकंपनीसह नागरिकांकडूनही याला पसंती दिली जात आहे.
हेही वाचा -यंदा बच्चे कंपनीचे मारणार फटाक्यांवर 'ताव'
फटाके चॉकलेटमध्ये अनेक पर्याय -
रॉकेट, भुईचक्र, पाऊस, लक्ष्मीबॉम्ब, सुतळी बॉम्ब, लवंगी माळ असे फटाक्यांचे विविध प्रकार चॉकलेटमध्ये पाहायला मिळत आहेत. डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट तसेच रसमलाई, थंडाई, ड्रायफ्रूट अशा विविध प्रकारात व फ्लेवर्समध्ये देखील हे फटाके चॉकलेट उपलब्ध आहेत. १०० रुपयांपासून ५०० रुपयेपर्यंतच्या किमतीत आकर्षक पॅकींग करून या फटाके चॉकलेटची विक्री केली जात आहे.
बच्चे कंपनी व ग्राहकांनी चांगला प्रतिसाद -
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर चॉकलेट फटाक्यांचा अनोखा प्रकार बच्चेकंपनीच्या पसंतीस पडत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत २००हून अधिक बॉक्स साधारणतः पंचवीस ते तीस किलो चॉकलेट फटाक्यांची विक्री स्मिता पाटील यांनी केली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हे चॉकलेट फटाके बनवण्यात येत असून पालघर, मुंबई तसेच ठाणे येथून या चॉकलेट फटाक्यांना मोठी मागणी असल्याचे स्मिता पाटील यांनी सांगितले आहे.