महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यांग विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात; 400 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग - handicapped student

जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागामार्फत 'दिव्यांग सप्ताह' राबवण्यात आला. यानिमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील ७ अनुदानित व ९ विनाअनुदानित शाळांतील ४३० कर्णबधिर, मूकबधिर, अंध, बहुविकलांग विद्यार्थ्यांनी या क्रीडास्पर्धेत सहभाग घेतला.

palghar
दिव्यांग सप्ताह

By

Published : Dec 5, 2019, 11:07 PM IST

पालघर - जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागामार्फत 'दिव्यांग सप्ताह' राबवण्यात आला. यानिमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन पालघर स. तु. कदम शिक्षण संस्थेच्या जीवन हायस्कूल क्रीडांगण येथे करण्यात आले होते. दीप प्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांचे पथसंचलन करून या स्पर्धांना सुरुवात झाली. यावेळी उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर केले.

दिव्यांग सप्ताहाच्या निमीत्ताने जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन

बुद्धिबळ, बादलीत बॉल टाकणे, गोळाफेक, लांब उडी, लगोरी, ५०-१००-२०० व ४०० मीटर धावणे इत्यादी स्पर्धांमध्ये मुलांनी आपले कौशल्य दाखविले. यावेळी आतंरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या जागृती सपकाळसह क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अनेक गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील ७ अनुदानित व ९ विनाअनुदानित शाळांतील ४३० कर्णबधिर, मूकबधिर, अंध, बहुविकलांग विद्यार्थ्यांनी या क्रीडास्पर्धेत सहभाग घेतला होता.

हेही वाचा - चोरट्याने मारला दुकानावर डल्ला, मोबाईल विसरल्याने सापडला पोलिसांच्या कचाट्यात

दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना ते सामान्य विद्यार्थ्यांपेक्षाही उत्कृष्ट आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कुठेही कमी पडू देणार नाही असे जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे म्हणाले. ते या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या क्रीडास्पर्धांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन तसेच विद्यार्थी, शिक्षक व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -अवैध दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, 48 लाखाचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details