पालघरमध्ये नगरसेवकांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव - पालघर लसीकरण तुटवडा
पालघर नगरपरिषद हद्दीत भगिनी समाज शाळा येथे जिल्हा आरोग्य विभागामार्फत फक्त एकच लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र याठिकाणी थोड्या प्रमाणातच लस उपलब्ध होत असल्याने नागरिक या लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासूनच रांगा लावत असल्याचे पाहायाला मिळत आहे.
पालघर -पालघर नगरपरिषदेच्या बंद असलेल्या आठ लसीकरण केंद्रावर नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना घेराव घालत आंदोलन केले. पालघर नगरपरिषद हद्दीत भगिनी समाज शाळा येथे जिल्हा आरोग्य विभागामार्फत फक्त एकच लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र याठिकाणी थोड्या प्रमाणातच लस उपलब्ध होत असल्याने नागरिक या लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासूनच रांगा लावत असल्याचे पाहायाला मिळत आहे. लसीकरणासाठी नागरिकांना मोठी खटाटोप करावी लागत असून त्रासही सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे मत आहे.