महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 24, 2020, 11:41 AM IST

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा प्रश्न प्रलंबित, विद्यार्थ्यांना पाठवले परत

पालघर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अजूनही झाला नाही. त्यामुळे नववी ते बारावीच्या विद्यार्थी शाळेतील प्रत्यक्ष वर्गांबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला नसल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आले आहे.

palghar school opening news
पालघर शाळा सुरू नाही

पालघर - जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अजूनही झाला नाही. त्यामुळे वाडा येथील पां.जा. हायस्कूल आणि कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थांना परत पाठवण्यात आले. जिल्ह्यातील नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे धोरण रखडले आहे. राज्यात बहुतांशी भागात प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार होणार होते. मात्र निर्णय न झाल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाने परत पाठवले.
या ठिकाणी वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील दहावीची रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. या विद्यार्थ्यांसाठी कोरोना संदर्भात संपूर्ण काळजी घेऊन परीक्षा घेतली जात आहे. मात्र याबाबत लवकरच मीटिंग बोलावली जात असल्याची माहिती दिली जात होती. यात 31 डिसेंबर पर्यंत पालकांची परवानगी घ्यावी व 5 ते 10 आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावी असे निर्देश दिल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली जात आहे.

विद्यार्थ्यांना पाठवले परत
पालघर जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या नाहीत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असे चित्र असताना मात्र पालघरमध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थी शाळेतील प्रत्यक्ष वर्गांबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला नसल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आले आहे. पां.जा. हायस्कूल व काॅलेज मध्ये 40 विद्यार्थी आले होते. मात्र शाळेकडून त्यांना परत पाठवण्यात आले. तर याच शाळेत जुलै महिन्यादरम्यान रखडलेल्या दहावीतील रिपीटर विद्यार्थी वर्गाच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येत होत्या.

पालघर शाळा सुरू नाही
शाळेसाठी आरोग्य तपासणी पथके नेमावी

पालघर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी माणिक गुरसल यांनी संबधित अधिकारीवर्गाची बैठक घेतली. यात 31 डिसेंबरपर्यंत पालकांची परवानगी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली. तर आरोग्य विभागाने शाळांसाठी किमान 5 ते 10 आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

हेही वाचा -येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार, रावसाहेब दानवेंचा दावा

हेही वाचा -अमेरिकेत ११ डिसेंबरपासून कोरोना लसीकरण सुरू होण्याची शक्यता; 'फायझर'चा पुढाकार

ABOUT THE AUTHOR

...view details