महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसईत दोन गटात हाणामारी, दगडफेकसह वाहनांची तोडफोड - वसई पालघर न्युज

वसई येथे बुधवारी दोन गटामध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

vasai palghar dispute
वसई दोन गट हाणामारी

By

Published : Jan 9, 2020, 1:34 PM IST

पालघर -वसई परिसरातील धानिब बाग येथे बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील १०० पेक्षा अधिकजण आमने-सामने आले होते. यावेळी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. संपत्तीच्या वादावरून हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

वसईत दोन गटात हाणामारी, दगडफेकसह वाहनांची तोडफोड

संबंधित हाणामारी प्रकरणात १० ते १२ वाहने फोडण्यात आली, तर एक मोटारसायकल पेटवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सध्या काही जणांना ताब्यात घेतले आहे. संपत्तीच्या वादावरून हा झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र, काही जणांनी या वादाला जातीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच पोलिसांनी परिसरातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हीआर ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details