महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Western Railway Timetable: नविन वेळापत्रकात डहाणू ते वैतरणा भागातील प्रवाशांचा अपेक्षाभंग - नविन पश्चिम रेल्वे वेळापत्रक

Western Railway Timetable: पश्चिम रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या नविन वेळापत्रकात (western railway new time table) डहाणू ते वैतरणा भागातील प्रवाशांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रवाशांची घोर निराशा झाल्याने सर्वदूर पश्चिम रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे (public protest against western railway).

western railway
पश्चिम रेल्वे

By

Published : Sep 30, 2022, 3:47 PM IST

पालघर- Western Railway Timetable: पश्चिम रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या नविन वेळापत्रकात (western railway new time table) डहाणू ते वैतरणा भागातील प्रवाशांचा अपेक्षाभंग झाला आहे. नविन वेळापत्रकात प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून आले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत मुंबईच्या दिशेने लोकल वाढवणे, लोकशक्तीचा सफाळे स्थानकातील थांबा काढल्याने त्या जागी लोकल सुरु करणे अशा आणि अनेक डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने केलेल्या मागण्यांना प्रशासनाने ह्या वेळापत्रकात स्थान दिलेले नाही.

डहाणू-वैतरणा विभागाला पुन्हा एकदा सावत्रपणाची वागणूक: डहाणू वरून सुटणारी मात्र लाॅकडाऊनच्या दरम्यान रद्द करण्यात आलेली ७:०५ ची लोकल पश्चिम रेल्वेच्या डीव्हीजनल रेल्वे मँनेजर ह्यांच्या आश्वासना नंतरही सुरु करण्यात आली नाही आहे. लाॅकडाऊन मधे सुरु केलेली ४:४० ची स्पेशल लोकल नियमित करण्यात आली असून तिचाच उल्लेख नविन सेवा असा करण्यात आला आहे. पहाटे डहाणू कडे जाणारी लोकल रद्द करुन तीच गाडी रात्री ९:२० वाजता डहाणू कडे सुरु करण्यात आली आहे आणि तिचाही उल्लेख नविन सेवा असा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीही नवी सेवा डहाणू ते वैतरणा भागातील प्रवाशांना मिळालेली नाही आहे (local railway timing change).

काही गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल:गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेची संध्याकाळी दादरहून ४:४७ मिनिटांनी सुटणारी गाडी पुनर्स्थापित करण्याची मागणी पुर्ण होण्याची शक्यता आहे. ही गाडी दादरहून विरार साठी सुटेल आणि विरारला पोहचल्यानंतर तीच गाडी विरार हून डहाणूला येणार आहे. तारापूर MIDC च्या दुसऱ्या पाळीच्या कर्मचार्यांसाठी रात्री ११ नंतर गाडी सुरु करण्याच्या मागणीला वेळापत्रकातच असलेली गाडीची वेळ १५ मिनिटांनी बदलून नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तुर्तास पश्चिम रेल्वेने केलेल्या वेळापत्रक बदलात डहाणू ते वैतरणा पट्यातील प्रवाशांची घोर निराशा झाल्याने सर्वदूर पश्चिम रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे (public protest against western railway).

ABOUT THE AUTHOR

...view details