वसई (पालघर) - वसई-विरार महानगरपालिका स्थापन होऊन दहा वर्षे झाली आहेत. आतापर्यंत महानगरपालिकेकडे पत्रकारांशी समन्वय साधण्याठी जनसंपर्क अधिकारी नव्हता. नवनियुक्त पालिका आयुक्त डी. गंगाथरन यांनी ४ जूनला पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र, या पत्रकार परिषदेला प्रमुख व ज्येष्ठ पत्रकारांना डावलण्यात आले होते तर काहींना कळवण्यात आले नव्हते. यांनंतर पत्रकारांनी महापालिका आयुक्त कार्यालयात जनंसपर्क अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती. याला प्रतिसाद देत महापालिका आयुक्त कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारीपदी दिपेश वझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वसई विरार महापालिकेच्या आयुक्त कार्यालय जनसंपर्क अधिकारीपदी दिपेश वझे यांची नियुक्ती - डी.गंगाथरन न्यूज
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय जनसंपर्क अधिकारीपदी दिपेश वझे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पत्रकारांच्या मागणीला प्रतिसाद देत तातडीने जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याबद्दल आयुक्त डी. गंगाथरन यांचे आभार मानले आहेत.

पत्रकारांना डावलण्यात आलेल्या प्रकरणावर केवळ प्रसारमाध्यमांतून टीका करणे हा उपाय नाही. पुढील काळात असे प्रसंग येऊ नये आणि जनसमन्वयातील कमतरता दूर करण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रने पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. हे निवदेन देत महापालिका आयुक्त कार्यालयात जनसंपर्क अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस, महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई यांनी केली होती .
पत्रकारांच्या या मागणीला पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय जनसंपर्क अधिकारीपदी दिपेश अशोक वझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वसई-विरार मधील पत्रकारांना जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व बातम्या मिळणार आहेत. महापालिका आयुक्तांनी तातडीने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे एनयुजे महाराष्ट्राच्यावतीने आभार मानले आहेत. कोषाध्यक्ष वैशाली आहेर तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई, सचिव अनिल पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र घरत यांनी नवनिर्वाचित जनसंपर्क अधिकारी दीपक वझे यांचे अभिनंदन केले.