पालघर- मुसळधार पावसामूळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहे. छोट्या मुलांसह वयस्कर लोकांचेचेही हाल सुरु आहे. प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालघर येथील जैन समुदायाने या प्रवाशांची मदत केली आहे.
पालघर रेल्वे स्थानकात प्रवाशांची जेवण व राहण्याची व्यवस्था; जैन बांधवांची सामाजिक बांधिलकी
रेल्वे गाड्या रद्द झाल्याने पालघर रेल्वेस्थानकात अडकलेल्या सुमारे दोनशे प्रवाशांना राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. जैन समाजाने आपल्या पालघर देवीसहाय रस्ता स्थित तेरापंथ भवन येथे ही व्यवस्था केली आहे.
हेही वाचा -मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात व वेळेत बदल
रेल्वे गाड्या रद्द झाल्याने पालघर रेल्वेस्थानकात अडकलेल्या सुमारे दोनशे प्रवाशांना राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. जैन समाजाने आपल्या पालघर देवीसहाय रस्ता स्थित तेरापंथ भवन येथे ही व्यवस्था केली आहे. आपात्कालीन स्थितीत अडकलेल्या प्रवाशांची सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यामुळे या प्रवाशांनीही त्यांचे आभार मानले आहेत.