महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील धामणी, कवडास धरण 'ओव्हरफ्लो'; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - तानसा, वैतरणा आणि पिंजाळ नदी

वाडा आणि विक्रमगड तालुक्यात रविवारी 305 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धामणी धरणातून सुर्यानदीमध्ये 42 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कवडास धरणातून 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By

Published : Aug 4, 2019, 12:54 PM IST

पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यातील धरणांमधील जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तानसा, वैतरणा आणि पिंजाळ नदीला पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

धामणी व कवडास धरण ओव्हरफ्लो

वाडा आणि विक्रमगड तालुक्यात रविवारी 305 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धामणी धरणातून सुर्यानदीमध्ये 42 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कवडास धरणातून 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर अधिक पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details