पालघर (वाडा) - येथील वाडा तालुक्यातील तिळसे गावात वैतरणा नदी आहे. या नदीतील मासे 'देवमासे' म्हणून संबोधले जातात. हे मासे पाहाण्यासाठी शिवलिंग असलेले तिळसेश्र्वराच्या मंदिरात पर्यटक वा वाटसरू मोठ्या संख्येने गर्दी करतात.
वाडा तालुक्यातील तिळसे येथून वैतरणा नदी वाहते. ही नदी तिळसे येथे उत्तरेकडून दक्षिण दिशेने काही ठिकाणी वाहते. नंतर पुढे पश्चिम दिशेने वाहून ती अरबी समुद्रास मिळते. या नदीपात्राच्या मोठ्या कातळावर (पाषाणावर) शंभु महादेवाचे शिवलिंग मंदीर आहे. या नदीपात्राच्या मोठ्या गोल आकाराच्या खाजणात मासे आढळून येतात. त्यांना इथले लोक देवमासे संबोधतात. या माशांचे वैशिष्ट्य असे की हे मासे मोठ्या पावसाच्या पुरात जात नाहीत. ते मंदिराच्या खाली भुयारी मार्गाच्या ठिकाणी राहतात. पुर ओसरला की पुन्हा ते दिसतात.