महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचाही घात केला' - Devendra Fadnavis on uddhav thackeray

महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करुन शिवसेनेने नव्या मित्रांशी घरोबा केला. जनतेचा विश्वासघात करुन तयार झालेल्या या सरकारने आता शेतकऱ्यांचाही विश्वासघात केल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

palghar
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला

By

Published : Jan 1, 2020, 6:21 PM IST

Updated : Jan 1, 2020, 7:22 PM IST

पालघर - महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करुन शिवसेनेने नव्या मित्रांशी घरोबा केला. जनतेचा विश्वासघात करुन तयार झालेल्या या सरकारने आता शेतकऱ्यांचाही विश्वासघात केल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

6 जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असून, आज देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथून प्रचाराला सुरुवात केली. डहाणू तालुक्यातील कासा येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, कपिल पाटील आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अतिशय योग्य असाच कौल दिला होता. निवडणुकीआधी झालेल्या युतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. पण, आमच्या मित्रांनी जनादेशाचा विश्वासघात केला आणि नव्या मित्रांशी घरोबा केला. केला तर ठीक. पण, आता त्यांनी निदान राज्यातील सरकार नीट चालवायला हवे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

विश्वासघात हा जसा या सरकारच्या गठनाचा पाया आहे. तसेच आता त्यांनी आपल्या एकेक निर्णयातून जनतेच्या, शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे. नव्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मुद्दाम वगळले. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ यातून मिळू शकत नसल्याचे फडणवीस म्हणाले. आमच्या मासेमार बांधवांना कुठलीही मदत मिळू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान झाले. पण सप्टेंबर 2019 ची अट टाकल्याने हे शेतकरी मदतीला मुकणार आहे. विश्वासघात हा ज्या सरकारचा पाया आहे, ते सरकार फार काळ टिकू शकणार नसल्याचेही ते म्हणाले.

Last Updated : Jan 1, 2020, 7:22 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details