पालघर - जिल्हा पोलीस दलातील डहाणूचे पोलीस उपअधीक्षक मंदार धर्माधिकारी यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेकरिता 'राष्ट्रपती पोलिस पदक' मिळाले आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंदार धर्माधिकारी यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे ध्वजारोहणानंतर हा सोहळा पार पडला.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंदार धर्माधिकारी पोलीस उपअधीक्षक मंदार धर्माधिकारी यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले धर्माधिकारी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 1988 बॅचच्या सरळ सेवेतील पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी 31 वर्षाच्या सेवा काळात मुंबई, नागपूर, ठाणे येथे काम केले आहे. तर 2017 साली त्यांना पोलीस महासंचालक पदकाने गौरविले होते. ते मूळचे नाशिकचे असून त्यांनी मुंबई येथे शिक्षण पूर्ण केले आहे.
यासोबतच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा- विलास सखाराम सुपे, पोलीस उपनिरीक्षक- सुधीर तात्या कटारे, अजित सदाशिव काणसे, जयेश आनंदा खदरकर, महेश भीमराव गावडे, प्रमोद बळीराम बनकर, मल्हार धनराज थोरात, नारायण कोळी, संदीप कृष्णा भोपळे, दिलीप विष्णू खडतर या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल 'विशेष सेवा पदक' पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग आदींसह जिल्ह्यातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते.