महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोळीवाड्याच्या जमिनीवर मालकी हक्क देण्याची मागणी - मच्छिमारांनी घेतली पटोलेंची भेट पालघर

सागरी किनारपट्टीवर वसलेल्या कोळीवाड्याच्या जमिनिवर मालकी हक्क देण्याच्या मच्छिमारांच्या मागणीला विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जमिनीबाबत लवकरच निर्णय घेऊन, मालकी हक्क नोंदीबाबत धोरण राबवू अशी माहिती पटोले यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळला दिली आहे.

कोळीवाड्याच्या जमिनीवर मालकी हक्क देण्याची मागणी
कोळीवाड्याच्या जमिनीवर मालकी हक्क देण्याची मागणी

By

Published : Feb 1, 2021, 11:01 PM IST

पालघर -सागरी किनारपट्टीवर वसलेल्या कोळीवाड्याच्या जमिनिवर मालकी हक्क देण्याच्या मच्छिमारांच्या मागणीला विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जमिनीबाबत लवकरच निर्णय घेऊन, मालकी हक्क नोंदीबाबत धोरण राबवू अशी माहिती पटोले यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळला दिली आहे.

2008 पासून मागणीचा पाठपुरावा

राज्याच्या सागरी किनारपट्टी भागात अनेक वर्षांपासून मच्छिमार समाज राहत आहे. मात्र त्या जमिनीचा मालकी हक्क अद्याप त्यांच्याकडे नाही. मच्छिमार समाज राहत असलेल्या कोळीवाडा जमिनीवर त्यांचा मालकी हक्क नसल्याने त्या जागेत काही विकास कामे करायची असल्यास त्यांना बँका कर्ज देत नाही. तसेच अनेक समस्या येत असल्याची तक्रार या मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने नाना पटोले यांच्याकडे केली आहे. 2008 मध्ये सर्वप्रथम दिवंगत मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनी या जमिनी मच्छिमार बांधवांच्या नावावर व्हाव्यात यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. तेव्हापासून या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे.

लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू

दरम्यान आज या पार्श्वभूमीवर मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन, आपल्या समस्या मांडल्या. यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लवकरात लवकर शासन धोरत पारीत करून प्रश्न निकाली काढू असे अश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details