महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: आठवा मृतदेह सापडला, एनडीआरएफची शोधमोहीम पूर्ण - तारापूर दुर्घटना न्यूज

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यानंतर तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी जखमी आणि मृत कामगारांचा शोध घेण्याचे करत होते. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाचारण करण्यात आले.

तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना
तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना

By

Published : Jan 12, 2020, 9:53 AM IST

Updated : Jan 12, 2020, 2:59 PM IST

पालघर -तारापूर औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट (ए. एन. के फार्मा) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या वाढून आठ वर गेली आहे. आठवा मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (एनडीआरएफ) यश आले आहे. या स्फोटात बेपत्ता झालेल्या लहान मुलीचा मृतदेह सापडला आहे. एनडीआरएफची शोधमोहीम पूर्ण झाली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई घटनास्थळाला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना मदत सुपूर्त करणार आहेत, अशी माहिती विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांनी दिली.

तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटनेतील आठवा मृतदेह सापडला

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यानंतर तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी जखमी आणि मृत कामगारांचा शोध घेण्याचे करत होते. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाचारण करण्यात आले. या दलाने सर्व आठ मृतदेह शोधून काढले.

विधान परिषद आमदार रवींद्र फाटक

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
दरम्यान पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळाला भेट देत जखमींची विचारपूस केली. सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख तर जखमी असलेल्या कामगारांना मोफत वैद्यकीय सेवा देणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

तारापूर औद्योगिक वसाहतीत एनडीआरएफची शोधमोहीम पुन्हा सुरू

दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे -
इलियास अन्सारी (वय 40)
निशु राहुल सिंह (वय 26)
माधुरी वशिष्ठ सिंह (वय 46)
गोलू सुरेंद्र यादव(वय 19)
राजमती देवी सुरेंद्र यादव (वय 40)
मोहन इंगळे (वय 45)
सातवा मृतदेह लिफ्टमनचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

बेपत्ता असलेल्या लहान मुलीचा मृतदेह सापडला.

दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे -
मुलायम जगत बहादूर यादव (वय 23)
राकेश कुमार चेतराम जायसवाल (वय 50)
सचिन कुमार रामबाबू यादव (वय 18)
रोहित वशिष्ठ सिंह (वय 19)
नटवरलाल बी.पटेल (वय 56) कंपनी मालक
प्राची राहुल सिंह (वय 6)
ऋतिका राहुल सिंह (वय 3)

Last Updated : Jan 12, 2020, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details