महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर; 1ऑक्टोबरपर्यंत 51 मृत्यूची नोंद - पालघर रेल्वे अपघात मृत्यूची संख्या बातमी

मृतदेह ठेवण्यासाठी शवागार सेवा उपलब्ध नसून पालघर रेल्वे स्थानकात एका सामाजिक संस्थेने एक शवपेटी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मृतांची लवकरात लवकर ओळख पटवून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यास पोलीस प्रयत्नशील असतात. असे असले तरीही बेवारस मृतांच्या संख्या देखील लक्षणीय आहे. 2018 मध्ये 32 बेवारस मृतदेह, 2019 मध्ये 34 बेवारस मृतदेह तर यावर्षी 15 बेवारस मृतदेह रेल्वे पोलिसांनी दफन केले आहेत.

death toll from train accidents has half compared to the last two years in palghar
रेल्वे अपघातातील मृतांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर

By

Published : Oct 29, 2020, 8:55 PM IST

पालघर -कोरोना काळात लांब पल्ल्याची रेल्वे सेवा अजूनही बंद असून उपनगरीय रेल्वे सेवा तीन महिन्याच्या खंडानंतर सुरू झाली आहे. रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असली तरीही यंदाच्या वर्षी रेल्वे अपघातात 51 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील पश्‍चिम रेल्वेच्या वैतरणा पुलापासून ते बोर्डी-उंबरगाव या राज्यातील सीमावर्ती भागापर्यंत यंदा हे 51 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या भागात ऑगस्टमध्ये एकही व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला नसून, सप्टेंबर महिन्यात मात्र 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2018 मध्ये 122 मृत्यू व 2019 मध्ये 209 मृत्यू झाले होते, 1 ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 51 मृत्यू झाले आहेत, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर
लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या सध्या मर्यादित स्वरूपात सुरू असून मालगाड्यांचे प्रमाण काही पटीने वाढले आहे. शिवाय उपनगरीय रेल्वे सेवा आणि पूर्वीच्या तुलनेत अधिक असल्याने रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. पालघर, बोईसर आणि डहाणू या शहरी भागात रेल्वेच्या पूर्वेकडील भागात जाण्यासाठी अनेकदा नागरिक रेल्वे रूळ ओलांडत असतात, एकीकडे रेल्वे प्रशासन पादचारी पुलाची उभारणी करत असताना त्याचा वापर असल्याने रेल्वे अपघात व मृतांच्या संख्या लक्षणीय राहिली असल्याने ही चिंतेची बाब आहे.रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमीं व्यक्तींना रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, दरम्यान जखमी दगावला तर मृत झालेल्या व्यक्ती डहाणू कॉटेज हॉस्पिटल, पालघर ग्रामीण रुग्णालय, दांडी (बोईसर) प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेले जाते. त्यानंतर मृतांचे नागरिक नातेवाईकांना संपर्क न झाल्यास अंत्यसंस्कार केले जातात. मृतदेह ठेवण्यासाठी शवागार सेवा उपलब्ध नसून पालघर रेल्वे स्थानकात एका सामाजिक संस्थेने एक शवपेटी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मृतांची लवकरात लवकर ओळख पटवून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यास पोलीस प्रयत्नशील असतात. असे असले तरीही बेवारस मृतांच्या संख्या देखील लक्षणीय आहे. 2018 मध्ये 32 बेवारस मृतदेह, 2019 मध्ये 34 बेवारस मृतदेह तर यावर्षी 15 बेवारस मृतदेह रेल्वे पोलिसांनी दफन केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details