पालघर -वसईतील भुईगाव येथील समुद्रकिनारी शनिवारी सकाळी मृत डॉल्फीन आढळली. मागील काही दिवसांत अनेक डॉल्फीन मासे आणि ऑलीव्ह रिडले या दुर्मीळ प्रजातीतील कासव मृत अवस्थेत समूद्रकिनारी सापडत आहेत. जलचरांसाठी ही चिंताजनक बाब आहे.
वसईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डाॅल्फीन - भुईगाव मृत डॉल्फीन न्यूज
भुईगाव येथील सुरूची बाग परिसरात किनाऱ्यावर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरीकांना एक मृत डॉल्फीन मासा वाहून आलेला आढळला. याबाबत नागरीकांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.
हेही वाचा - रेल्वेतून वन्य पशुपक्षांची तस्करी; टोळीच्या म्होरक्यासह तिघे वनविभागाच्या जाळ्यात
भुईगाव येथील सुरूची बाग परिसरात किनाऱ्यावर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना एक मृत डॉल्फीन मासा वाहून आलेला आढळला. याबाबत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मृत डॉल्फीनचा पंचनामा केला. त्यानंतर मृत डॉल्फीनला किनाऱ्यावर पुरले. पाच फूट लांब असलेल्या या डॉल्फीनचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.