दत्तात्रय शिंदे पालघरचे नवे पोलीस अधीक्षक; गडचिंचले प्रकरणानंतर गौरव सिंग यांची अखेर बदली - पालघर नवीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता गौरव सिंग यांची बदली करण्यात आली असून पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांडानंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानंतर आता दत्तात्रय शिंदे यांची पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रय शिंदे हे सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई या ठिकाणी कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शासन आदेशाद्वारे या नियुक्तीची माहिती दिली असून कामाच्या ठिकाणावरून त्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.