महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर लोकसभेसाठी दलित पँथरचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा - पाठिंबा

पालघर लोकसभेसाठी दलित पँथरने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

दलित पँथरचे कार्यकर्ते

By

Published : Apr 5, 2019, 7:51 PM IST

पालघर - दलित पँथर पक्षप्रमुख आणि केंद्रीय अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, हा पाठिंबा कार्यकर्त्यांना अमान्य आहे. त्यामुळे त्यांनी पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

मल्लिका यांनी लोकसभेसाठी शिवसेना-भाजपला दिल्यामुळे त्यांचे पँथरचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पालघर लोकसभा जागेसाठी आपला पाठिंबा बहुजन विकास आघाडीला जाहीर केला.

दलित पँथरच्या कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद

विद्यमान सरकारच्या काळात भारतात दलित, मुस्लिम आणि आदिवासी अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विद्यमान सरकारचे अनेक मंत्री उघड-उघड संविधान बदलण्याची भाषा करतात. तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहेत. काहींची मजल तर संविधान जाळण्यापर्यंत सुद्धा गेली आहे. अच्छे दिनची स्वप्ने दाखवत मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या बँक अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये टाकू, अशी आश्वासने दिली. मात्र, ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. सरकार जनतेची फसवणूक केली. त्यामुळे अशा सत्ताधाऱ्यांना सेना- भाजपला पालघर लोकसभा मतदारसंघात मदत न करण्याचा निर्णय दलित पँथरने घेतल्याचे पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

या पत्रकार परिषदेसाठी बिंबेश जाधव (जिल्हा अध्यक्ष, पालघर), जगदिश राऊत (जिल्हा महासचिव) यासह अनेक दलित पँथरचे पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details