महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 29, 2019, 10:37 AM IST

Updated : Sep 29, 2019, 12:43 PM IST

ETV Bharat / state

डहाणूतील आदिवासी कलाकाराने जपानच्या भिंतीवर साकारली 'वारली' संस्कृतीची कलाकृती

आदिवासी समाजाची ओळख असलेल्या वारली चित्रकलेला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. डहाणूत राहणाऱ्या राजेश मोर या कलाकाराचे वारली चित्र जपानच्या शाळेतील भिंतीवर साकारण्यात आले आहे.

'वारली' संस्कृती जपानच्या भिंतीवर

पालघर - आदिवासी समाजाची ओळख असलेल्या वारली चित्रकलेला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. डहाणूत राहणाऱ्या राजेश मोर या कलाकाराचे वारली चित्र जपानच्या शाळेतील भिंतीवर साकारण्यात आले आहे. याची ख्याती समाज माध्यमांवर पसरल्यानंतर राजेश मोर यांना वारली चित्रकलेसाठी मोठी मागणी येऊ लागली आहे.

जपानच्या विद्यार्थ्यांनी शिकून घेतली आदिवासी वारली चित्रकला


डहाणूतील गंजाड जवळील नवनाथ (दौडनपाडा) गावातील राजेश मोर यांचे वारली चित्रकलेतील नैपुण्य पाहिल्याने जपानच्या 'वॉल आर्ट प्रोजेक्ट' या संस्थेकडून त्यांना इन्होवाशिरो येथील शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे या शाळेतील १४ फूट रुंद व ८५ फूट उंचीची भिंत राजेश यांच्या वारली चित्रकलेने साकारण्यात आली असून या भिंतीवर जपानचे पूर्वीचे आणि सध्याचे जीवनमान कथास्वरूपात साकारण्यात आले आहे. सध्या राजेश यांच्या वारली चित्रकलेची ख्याती सर्वदूर पसरली असून फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका येथे त्यांच्या चित्रांना मागणी आहे.

आदिवासी वारली चित्रकलेची जपानवरही भुरळ


राजेश यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. कोणतेही चित्र काढायला घेतल्यावर राजेश यांच्या हातून उत्तम चित्रकला साकारत होती. त्यांच्या चित्रकलेतील आवडीमुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात निवडणुका, जाहिरातींसाठी लागणारे फलक तयार करण्याचे काम केले. कालांतराने वारली चित्रकलेत विशेष कौशल्य प्राप्त झाल्यावर वारली चित्रकलेलाच राजेश यांनी आपला व्यवसाय मानला.

हेही वाचा - जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'ग्रेटा'ला चंद्रपूरच्या तरुणाईची साथ, पर्यावरण वाचविण्यासाठी घेतला पुढाकार
इयत्ता पाचवीपर्यंत गंजाड व नंतर दहावीपर्यंत राजेशचे शिक्षण धुंदलवाडी येथे झाले मात्र परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. आपल्या आईसोबत लग्नामध्ये 'चौक' काढण्यास राजेश मदत करीत असे. इतर वारली चित्रकारांचे अनुकरण करत राजेश पुढे शिकला व 'आर्टीशियन' या संस्थेत नोंदणी केल्यानंतर देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून या कलेचा अनुभव घेत राहिला. निरीक्षण शक्तीच्या आधारे त्यांनी वेगवेगळ्या आदिवासी दंत कथावर आधारित आदिवासी संस्कृती विविध गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. डहाणू येथील फिरोजा ताप्ती यांच्या प्रयत्नामुळे त्याला जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाली.

हेही वाचा - विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त
जपानस्थित वॉल आर्ट प्रोजेक्ट या संस्थेच्या वतीने २०१० पासून ग्रामीण भागातील शाळेत 'भिंत कला प्रदर्शन' भरवण्यात येते. २०१३ मध्ये या संस्थेच्या अकिको ओकुनी आणि हमायु ओकुनी यांनी डहाणूतील गावात भेट दिल्यावर त्यांना राजेश यांनी काढलेली वारली चित्रे आवडली. राजेश यांचे वारली कलेतील प्राविण्य पाहिल्यावर या संस्थेने त्यांना जपानमधील शाळेत विद्यार्थ्यांना वारली चित्रकला शिकवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. जपानमध्ये राजेश यांनी एक महिना इनोव्हाशिरो शहरातील शाळेत पाचवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना वारली चित्रकला शिकवली. केवळ हाताच्या अंगठ्यापासूनही उत्तम चित्रकला साकारण्यात येऊ शकते याविषयी जपानी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. या आदिवासी कलाकारांच्या चित्रांना अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पॅरिस अशा जगभरातून मागणी येत असून पूर्वीपेक्षा या आदिवासी कलाकारांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.


जपानच्या शाळेच्या भिंतीवर 'वारली चित्रकला' -


या शाळेतील १८ फूट रुंदी व ८५ फुटांची एक भिंत राजेश यांनी वारली चित्रकलेने रंगवली आहे. यात जपान आणि भारत यांच्या ग्रामीण जीवनशैलीत साधर्म्य असल्याचे चित्र साकारण्यात आले आहे. तसेच जपानमधील पूर्वीची जीवनशैली आणि आधुनिक जीवनशैली याचे वर्णन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आदिवासींप्रमाणेच जपानमध्ये जंगलात पिकणाऱ्या खाद्यपदार्थांवर लोक अवलंबून आहेत, असे दर्शवणारे चित्र साकारण्यात आले आहे.

हेही वाचा - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला जव्हारचा 567 वा शाही उरूस उत्साहात
जपानमध्ये फार पूर्वीपासून एक आख्यायीका आहे. पारंपरिक शेती करताना एका शेतकरी कुटुंबाने आपल्या लहान मुलांना शेतजमीनीजवळ असणाऱ्या उंच दगडाजवळ खेळण्यासाठी ठेवले होते. या दगडाजवळूनच शेतीला आवश्यक असणारे पाणी मिळत होते. लहान मुले बराच वेळ आनंदात या दगडावर खेळात होते, उड्या मारत होते म्हणून उत्सुकतेने शेतकरी या दगडाजवळ गेले. मात्र दगडापाशी गेल्यावर शेतकऱ्यांच्या ध्यानात आले हा दगड नसून तो मोठ्या आकाराचा बेडूक होता. या बेडकाजवळूनच शेतीला मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकरी त्याची पूजा करू लागले. आजही जपानमध्ये असलेल्या शेतजमिनीत कुठेतरी हा दगड असतो, या दगडाच्या शेजारी शेतीला मिळणारे पाणी वाहत असते. म्हणून जपानी शेतकरी त्या दगडाची पूजा करतात. ही कथा राजेश यांनी शाळेच्या भिंतीवर साकारली आहे.

Last Updated : Sep 29, 2019, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details