पालघर- जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज सकाळपासून भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. एकाच दिवसात भूकंपाचे तीन धक्के बसल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण आहे.
डहाणू,तलासरी परिसरात दिवसभरात भूकंपाचे तीन धक्के; नागरिकांमध्ये घबराट - earthquake in Dahanu
डहाणू, तलासरी परिसरात आज तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी 1 आणि सायंकाळी 2 धक्के बसले. एकाच दिवसात भूकंपाचे तीन धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
डहाणू, तलासरी परिसरात आज सकाळी 11:39 वाजता 2.8 रिष्टर स्केल तीव्रतेचा, सायंकाळी 5:23 वाजता 3.0 तीव्रतेचा आणि 6: 47 वाजता 3.1 रिष्टर स्केल तीव्रतेचा असे एकूण भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. या भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते व केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती.
डहाणू, तलासरी, कासा, धुंदलवाडी, धानीवरी, उर्से व आसपासच्या परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर 2018 पासून डहाणू व तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेले काही महिने भूकंपाची तीव्रता कमी झाली होती. मात्र, आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नुकसान झाल्याबद्दलची माहिती अजूनही प्राप्त झालेली नाही.