पालघर -डहाणू तालुक्यातील बारड डोंगरावरील जंगलात झाडाच्या फांदीला गळफास घेऊन डहाणूतील प्रेमीयुगलाने आत्महत्या केली आहे. योगेश मिठ्या निमला आणि संजना नथु आगरी अशी या आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
डहाणू तालुक्यातील बारड डोंगरावरील जंगलात योगेश मिठ्या निमला (वय २१, रा. वंकास) आणि संजना नथु आगरी (वय १९, रा. तलोटे) यांनी झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले.