महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dahanoo Forcible conversion : डहाणूत जबरदस्तीने धर्मांतरणाचा डाव उधळला; चार मिशनरींना अटक - Conversion

पालघर जिल्ह्यात आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास ( Christianity ) तुमचे सर्व दुखणे बंद होईल, असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा डाव डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला. घरात एकटी असलेल्या वयस्कर आदिवासी महिलेला पैशांचे आमिष ( Conversion ) दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारणायास भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या चार मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Conversion Palghar District
जबरदस्तीने धर्मांतरण

By

Published : Aug 8, 2022, 8:32 AM IST

Updated : Aug 8, 2022, 9:26 AM IST

पालघर/डहाणू : आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे ( Christianity ) सर्व दुखणे बंद होईल, असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा डाव डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला. डहाणूजवळील सरावली तलावपाडा येथे घरात एकटी असलेल्या वयस्कर आदिवासी महिलेला पैशांचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारणायास ( Conversion ) भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या चार मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

जबरदस्तीने धर्मांतरण

पालघर जिल्ह्यात धर्मांतरणाची समस्या जुनीच : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासीबहुल तालुक्यात धर्मांतरणाची समस्या खूप जुनी आहे. या भागातील गरीब आशिक्षित आदीवासींना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत तसेच विविध आमिषे दाखवत धर्मांतरण केले जात आहे. यामुळे गावोगावी मूळ हिंदू आदिवासी आणि धर्मांतरण केलेले ख्रिश्चन आदिवासी यांच्यात सण-उत्सव आणि इतर प्रथा साजर्‍या करण्यावरून वारंवार वाद निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत.


महिलेला धर्मांतरणाची सक्ती केल्याने पोलिसांत तक्रार : डहाणूजवळील सरावली तलावपाडा येथे चार ख्रिश्चन मिशनरींनी एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बरे होईल. त्याचबरोबर पैसे देण्याचे आमिष दाखवत तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू नका, आमच्या धर्माचे पालन करा, असे सांगून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याची तक्रार या महिलेने डहाणू पोलिसांत केली आहे.


स्थानिक ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मप्रसारकांना घेतले फैलावर : गावात ख्रिश्चन धर्मप्रसारक आल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमून त्यांनी मिशनरीना फैलावर घेत त्यांचावर प्रश्नांचा भडीमार केला. महिलेच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी क्लेमेंट डी. बैला, मरियामा टी. फिलीप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा या चार मिशनरीना ताब्यात घेऊन भा. दं. वि. कलम १५३ , २९५ , ४४८, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी :डहाणू , तलासरी या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन मशनरी नागरिकांकडून गोरगरीब जनतेची दिशा भूल करून व त्यांना विविध प्रकारच्या आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात करण्याचे प्रकार सुरू असून यावर प्रशसनाने तात्काळ आळा घालावा, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू सेवा संघ प्रदेश महामंत्री महाराष्ट्र प्रवीण व्यास यांनी केली आहे.

हेही वाचा : Sanjay Raut ED Custody : संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी

Last Updated : Aug 8, 2022, 9:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details