महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cyrus Mistry Accident : सायरस मिस्त्रींच्या अपघाताचे कारण झाले स्पष्ट; फॉरेन्सिक टीमने दिले 'हे' उत्तर - सायरस मिस्त्रींच्या अपघाताचे कारण झाले स्पष्ट

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. यात अपघातग्रस्त कारची चौकशी सध्या सुरु आहे. याच चौकशीत फॉरेन्सिक टीमने कार अपघाताला चूकीचे ब्रिज डिझाइन Cyrus Mistry accident due to Faulty bridge design कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

Cyrus Mistry Accident
Cyrus Mistry Accident

By

Published : Sep 7, 2022, 6:05 PM IST

Updated : Sep 7, 2022, 7:14 PM IST

मुंबईटाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. यात अपघातग्रस्त कारची चौकशी सध्या सुरु आहे. याच चौकशीत फॉरेन्सिक टीमने कार अपघाताला चूकीचे ब्रिज डिझाइन Cyrus Mistry accident due to Faulty bridge design कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रीयांचा कार अपघातात मृत्यू झाला.मिस्त्री यांच्या कारला झालेल्या अपघाताचा तपास सुरू आहे. सात सदस्यीय फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुलाचा आराखडा सदोष असल्यानं मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेन्झला अपघात झाल्याचा निष्कर्ष फॉरेन्सिक पथकानं काढला आहे. तसेच मिस्त्रींचा मृत्यूला सीटबेल्टचा न वापर करणे हे देखील कारणीभूत असल्याचं या पथकानं तपासणीअंती सांगितलं.Body:अपघात झाल्यानंतर कारमधील सेफ्टी फीचर्सनी त्यांचं काम केलं. अपघात होताच एअरबॅग्स उघडल्या, असं फॉरेन्सिक पथकानं अपघातग्रस्त कारची पाहणी केल्यानंतर सांगितलं. या पथकात पोलीस दलासह वाहतूक विभागाच्या सदस्यांचा समावेश होता. कार भरधाव वेगात पळत होती. तिचा नेमका वेग किती होता, याची तपासणी सुरू आहे, अशी माहिती पथकाने दिली. पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या समस्येमुळे अपघात झाला. ज्या पुलावर अपघात झाला, त्याचा आराखडा, रचना सदोष आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. कारची अवस्था आणि कारमधून प्रवास करणाऱ्यांना झालेली दुखापत पाहता कार भरधाव वेगात असल्याचं स्पष्ट होत असल्याची माहिती सुत्रांनी सांगितले.

पालघर-मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बेजबाबदारपणामुळे कारचा अपघात होऊन प्रसिद्ध उद्योगपती तसेच टाटाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री व जहांगीर पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेल्या डॉ.अनायता पंडोल आणि त्यांचे पती दारीयस पंडोल हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी वापी येथील रेनबो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( 29 Accident Spots Marked on Mumbai Ahmedabad Highway )

मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला :गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. तसेच, महामार्गावर सूचनाफलक, संपर्क क्रमांक फलक नसल्याने वाहन चालकांना महामार्गावरील त्रुटी समजण्यास अडचणीचे ठरत आहे. सूर्या नदीवर ज्या ठिकाणी काल सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला, तिथे तीन पदरी रस्ते निमुळते होऊन दोन पदरी होत होते. सदर ठिकाणी याबाबतचा सूचनाफलक नसल्याने भरधाव वेगाने असलेली त्यांची कार नियंत्रणाच्या बाहेर जाऊन डिव्हायडरला जोरदार धडकली, असे सांगितले जाते.

हा महामार्ग आता मृत्यूचा महामार्ग बनलाय :मुंबई-अहमदाबाद महामार्ग अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. हा महामार्ग आता मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे. मनोर ते आच्छाड या 52 किमीच्या मार्गावर दीड वर्षांत 90 पेक्षा जास्त अपघातात 106 जणांचा बळी गेला आहे. तर 49 जण कायमचे अपंग झाले आहेत. मेंढवण, आंबोली, चारोटी उड्डाणपूल परिसर हे अतिधोक्याचे आहेत.

Last Updated : Sep 7, 2022, 7:14 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details