नालासोपारा (पालघर) - नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या फळ आणि भाजी मंडईत फेरीवाले विक्रेते सर्वसामान्य ग्राहकांची खुलेआम लूट करत आहेत. हा प्रकार ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जादाचे पैसा कमवता यावे, यासाठी काही विक्रेते चक्क मोजमाप करणाऱ्या काट्याखाली दगड ठेवत असून ग्राहकांना लुबाडण्याचे काम करत आहेत. मापात पाप करणारा हा गोरखधंदा नेमका कसा आहे, यबाबतीत 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.
नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांकडून ग्राहकांची लूट; कारवाईची स्थानिकांची मागणी - नालासापोरा भाजी आणि फळांची मंडई
वजन काट्याचे वैधमापन अधिकाऱ्यांकडून प्रमाणबद्ध केले जाते. मात्र, सुरू असलेल्या गोरखधंद्यात वैधमापन वसई तालुक्यात अस्तित्वात आहे की नाही? याची शंका उपस्थित केली जात आहे. शिवाय हे मुजोर फेरीवाले वजनावरून एखाद्या ग्राहकाने हुज्जत घातली तर अरेरावी करून त्यांच्यांवर दादागिरी करत असल्याचा तक्रारी ग्राहकांमधून केल्या जात आहेत.
फळ विक्रेते