पालघर- पावसाळा सुरू होताच पर्यटकांना गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाण्याची ओढ लागते. त्यातच कोरोना निर्बंधामुळे नागरिक अनेक दिवस घरातच होते. त्यामुळे निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावलेही पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा-खडकोना या गावातील आशेरी गडावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळात आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र समोर आहे.
कोरोना नियम पायदळी
पालघर जिल्ह्यात आशेरी गडावर आलेल्या पर्यटकांकडून कोरोना नियमांना केराची टोपली दाखवविण्यात आल्याचे समोर आले आहे. पर्यटकांनी तुफान गर्दी करत प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले आहे. रविवारची सुट्टी असल्याने हजारोच्या संख्येने पालघरसह, मुंबई, ठाणे, गुजरात या बड्या शहरातील हजारो पर्यटक गडावर दाखल झाले आहेत.