पालघर : पुष्पा चित्रपटातील चंदनाच्या तस्करी प्रमाणे ( Like Pushpa movie style ) वसईत चंदन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाळीव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी एक मोठा कंटेनर भरून चंदन जप्त ( Sandalwood seized ) केला आहे.
Sandalwood Seized : पुष्पा स्टाईल कारवाई; वसईत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त - चंदन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाळीव पोलिसांनी चंदन तस्कारांकडून कोट्यवधी रूपयांचे चंदन जप्त ( Crores of rupees worth Sandalwood seized ) केले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून सध्या वन विभाग आणि पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. जप्त केलेल्या चंदनाची आंतराराष्ट्रीय बाजारात तब्बल 6 करोडपेक्षा जास्त किंमत आहे.
चंदनाची किंमत करोड रूपये :वसई कोट्यावधी रुपयांचा रक्तचंदन जप्त करत पोलिस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई केली आहे. जप्त केलेल्या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात 6 कोटी पेक्षा जास्त किंमत आहे.
अशी केली कारवाई : कांद्याच्या आड चंदन भरून उरणच्या न्हावा शेवा बंदरात हा कंटेनर जात होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून सध्या वन विभाग आणि पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. तर दुसरीकडं आरोपींची चौकशी सुरू आहे. हे चंदन आंध्र प्रदेशातून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरात नेत असल्याचा माहिती पोलीसांनी दिली आहे.