पालघर -जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात 'सिस्को वेबेक्स' या अॅप्लिकेशनच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुनर्वसन व पुनर्स्थापना समितीच्या घेण्यात आलेल्या बैठकीला डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विरोध दर्शवत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेनपेक्षा कोरोना महामारीच्या काळात कोरोनाकडे शासनाने पूर्ण लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकल्पात मुंबई अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये आदिवासी भागातील डहाणूमधील 16, तलासरीमधील 7, पालघरमधील 27 तर वसई मधील 21 अशी एकूण 71 गावे असून त्यांत हजारो शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे.
माकपकडून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बैठकीचा निषेध - vinod nikole latest news
बुलेट ट्रेनपेक्षा कोरोना महामारीच्या काळात कोरोनाकडे शासनाने पूर्ण लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकल्पात मुंबई अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये आदिवासी भागातील डहाणूमधील 16, तलासरीमधील 7, पालघरमधील 27 तर वसई मधील 21 अशी एकूण 71 गावे असून त्यांत हजारो शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे.
अल्पभुधारक शेतकरी वर्गाची भूमी संपादित केली जाईल. त्याला मोबदला मिळेल. मात्र, या कोरोना काळात शेती किती महत्त्वाची आहे ते समजले. या बुलेट ट्रेनचा फायदा येथील शेतकरी वर्गाला होणार नाही व शेतकरी त्या ट्रेनमध्ये बसणार नाहीत. त्यापेक्षा डहाणू ते चर्चगेट या रेल्वे सुविधांवर लक्ष द्यावे. या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे आमदार विनोद निकोले यांनी यावेळी सांगितले. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व पंचायत समिती पदाधिकारी, सर्व सरपंच, खासदार राजेंद्र गावित, आ. विनोद निकोले, आ. श्रीनिवास वनगा, आ. राजेश पाटील, बुलेट ट्रेन कार्यकारी मनीषा गिंभल आदी उपस्थित होते.