पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी 75 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी पालघर तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शनिवारी अढळलेल्या 75 कोरोना रुग्णांपैैकी 22 पालघर तालुक्यातील, 1 डहाणू तालुक्यातील, 2 जव्हार तालुक्यातील, 11 वाडा तालुक्यातील, 2 विक्रमगड तालुक्यातील आणि 37 वसई ग्रामीण भागातील आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 हजार 292 इतकी झाली असून, 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 695 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 579 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.