महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Couple ran away from jammu kashmir: जम्मू - काश्मीर येथून पळून आलेल्या प्रेमी युगुलाला पालघर येथून पोलिसांनी घेतले ताब्यात - पालघर पोलीस जम्मू काश्मीर प्रेमी युगुल ताब्यात

जम्मू - काश्मीरमधून पळ काढलेल्या प्रेमी युगुलाला ( Couple ran away from jammu kashmir ) पालघर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जम्मू - काश्मीर येथील एका गावात राहणाऱ्या तरुणाचे जवळच राहत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेम संबंधांना विरोध होऊ लागल्यानंतर या प्रेमी युगुलाने जम्मू - काश्मीरमधून पळ काढला.

couple jammu kashmir caught by police in palghar
पालघर पोलीस जम्मू काश्मीर प्रेमी युगुल ताब्यात

By

Published : Mar 26, 2022, 11:03 AM IST

Updated : Mar 26, 2022, 1:59 PM IST

पालघर -जम्मू - काश्मीरमधून पळ काढलेल्या प्रेमी युगुलाला ( Couple ran away from jammu kashmir ) पालघर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जम्मू - काश्मीर येथील एका गावात राहणाऱ्या तरुणाचे जवळच राहत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेम संबंधांना विरोध होऊ लागल्यानंतर या प्रेमी युगुलाने जम्मू - काश्मीरमधून पळ काढला. याप्रकरणी 5 मार्च रोजी राजौरी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रेमी युगुलाचे दृश्य

हेही वाचा -पालघर-मनोर मार्गावर धावत्या टेम्पोला आग; चालकाने टेम्पो थेट उतरवला नदीत

मोबाईल लोकेशनद्वारे लागला शोध-

राजौरी पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले असता ते विविध भागांत आढळून येत होते. त्यानंतर आरोपीने आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवल्याने अनेक दिवस त्याचा शोधच लागला नाही. मात्र, काही दिवसानंतर आरोपी तरुणाने आपला बंद ठेवलेला मोबाईल सुरू केल्यावर त्यावर तरुणांचे लोकेशन जोगेश्वरी, मुंबई आढळून आले. पोलिसांनी अधिक शोध घेतला असता आरोपी आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे जोगेश्वरीमध्ये राहत असल्याचे उघड झाले. राजौरी पोलिसांनी आरोपीशी संपर्क साधत आम्ही आपणास न्यायला येतो असे कळवले. पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने प्रेमी युगुलाने जोगेश्वरीमधून पळ काढला.

पालघर येथे पोलिसांनी युगुलाला घेतले ताब्यात-

जोगेश्वरी येथून पळ काढून या प्रेमीयुगुलाने पालघर गाठत नवली- विष्णूनगरमधील एक रूम भाड्याने घेतली. मागील 8-10 दिवस ते पालघरमध्ये राहात होते. याबाबतची माहिती पालघर पोलिसांना मिळाल्यानंतर पालघर पोलिसांच्या मदतीने राजौरी पोलिसांनी या प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले व दोघांना घेऊन राजौरी पोलीस जम्मू - काश्मीरकडे रवाना झाले.

हेही वाचा -Student Deathbody Found : उमरोळीजवळील विहिरीत आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह; आत्महत्या की हत्या?

Last Updated : Mar 26, 2022, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details