पालघर - प्रेमीयुगुलांनी आपल्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली असा व्हाट्सअप स्टेटस ठेऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तलासरी येथे घडली आहे. रेश्मा डिकर व आशिश दुमाडा अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत.
तलासरीतील रेश्मा डिकर ( रा.तलासरी, बारातपाडा) व आशिस दुमाडा (रा. तलासरी) हे दोघे मागील तीन दिवसांपासून घरातून निघून गेले होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास तलासरी येथे महामार्गालगतच्या टेकडीवर असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविले.